पसायदान हे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर लिहिलं की आधी लिहीली?
पसायदान हे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर लिहिलं की आधी लिहीली? महाराष्ट्रातील थोर संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी पसायदान लिहिले आहे. श्रीमद भगवत गीतेचे मराठी प्राकृत भाषेतील विवेचन म्हणजे ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या शेवटी संत ज्ञानेश्वरांनी ईशवराकडे पसायदान मागितले आहे. पसायदान हे महाराष्ट्रातील घराघरांत ज्ञात असलेले काव्य आहे. अनेक कार्यक्रमांच्या शेवटी हे म्हटले जाते. म्हणताना योग्य चाळीत म्हटले तर हे अतिशय कर्णमधुर असे काव्य आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी या काव्याला फार सुंदर संगीत दिले असून लता मंगेशकर यांनी हे अतिशय सुमधुर आवाजात गायिले आहे. युट्युबवर हे ऐकावयास मिळेल. कधी म्हणावे? खरेतर कधीही. सकाळी स्नानादिकानंतर अथवा संध्याकाळी दिवेलागणीच्या सुमारास म्हणल्यास उत्तम. या वेळांत म्हणले की मन प्रसन्न होते. एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या शेवटीसुद्धा म्हटले जाते. कोणी म्हणावे? सर्वांनी. बोलता यायला लागल्यापासून ऐकल्यास तीन तेचार वर्षाची लहान मुलसुद्धा आरामात म्हणू शकतात. काही शब्द मुलांना अवघड जाऊ शकतात पण सरावाने मुखोद्गत होत...