श्री संजीवनी समाध्या विषयी माहिती
नवनाथांच्या समाधी ठिकाण श्री संजीवनी समाध्या विषयी माहिती १) मच्छिंद्रनाथ समाधी: अहमदनगर- पाथर्डी रोडवरून निवडुंगे गावात उतरणे. तेथुन तीन कि.मी अंतरावर मढी येथे यावे.मढीवरून ५ कि. मी. अंतरावर पायी जाण्यासाठी मार्ग आहे, किंवा नगर पाथर्डी रोडवर देवराई फाट्यावरून १२ कि. मी. अंतरावर मच्छिंद्रनाथ गड आहे. तसेच नगर - चिचोंडी पाटील - सुलेमान देवळा - बीड या मार्गावरून सुध्दा रस्ता आहे. २) जालिंदरनाथ समाधी: अहमदनगर - पाथर्डी - पाटोदा - बीड या रोडवरून रायमोह गावात उतरणे. तेथुन ५ कि. मी. अंतरावर जालिंदरनाथ देवस्थान आहे. तसेच डोंगरकिन्ही मार्गेसुद्धा रस्ता आहे. ३) कानिफनाथ समाधी: अहमदनगर - पाथर्डी रोड किंवा बीड - पाथर्डी - नगर या रोडवर निवडुंगे फाट्यावर उतरणे व तेथुन दक्षिणेला ३ कि. मी. अंतरावर कानिफनाथ गड किल्ल्याच्या स्वरूपात आहे. गावाच्या आसपास पुरातन दगडी बांधकामाच्या तीन भव्य बारवा आहेत. त्यांचे दगडी बांधकाम बघण्यासारखे आहे. आसपासचा परीसर निसर्गरम्य आहे. ४) भर्तृहरीनाथ समाधी: बीड जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी परळी वैजनाथ - गंगाखेड रोडवर वडगांव फाट्यावर उतरून हरंगुळ गावी जावे. तेथे ...
Comments
Post a Comment