भजन : विठोबा रखुमाई । जय जय विठोबा रखुमाई ।।


।।एकोणीस॥ नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी । पापे अनंत कोटी गेली त्यांची ॥१॥ अनंत जन्मांचे तप एक नाम । सुगम हरिपाठ ॥२॥ योग याग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठीं ॥३॥ ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म । हरिविण नेम नाहीं दुजा ॥४॥

॥वीस॥ वेदशास्त्रपुराण श्रुतिचे वचन । एक नारायण सार जप ॥१॥ जप तप कर्म हरिविण धर्म । वा‌उगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥ हरिपाठीं गेले ते निवांतचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥३॥ ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र । यमें कुळगोत्र वर्जियेले ॥४||

॥ एकविस ॥ काळ वेळ नाम उच्चारितां नाही । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥१॥ रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण । जडजीवां तारण हरि एक ॥२॥ हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या देवाची कोण वानी ॥३॥ ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजां वैकुंठ-मार्ग सोपा ॥४॥

॥ बाविस ॥ नित्यनेम नामीं ते प्राणी दुर्लभ । लक्ष्मीवल्लभ तयां जवळी ॥१॥ नारायण हरि नारायण हरि । भुक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥२॥ हरिविण जन्म तो नरकचि पैं जाणा । यमाचा पाहुणा प्राणि होय ॥३॥ ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड । गगनाहुनि वाड नाम आहे ॥४॥

/p>

॥ तेविस ॥ सात पांच तीन दशकांचा मेळा । एक तत्त्वीं कळा दावी हरि ॥१॥ तैसें नव्हे नाम सर्वत्र वरीष्ठ । तेथें कांहीं कष्ट न लागती ॥२॥ अजपा जपणें उलट प्राणाचा । तेथेंहि मनाचा निर्धार असे ॥३॥ ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ । रामकृष्णीं पंथ क्रमियेला ॥४॥

॥ चौविस ॥ जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वांघटीं राम भाव शुद्ध ॥१॥ न सोडी हा भावो टाकी रे संदेहो । रामकृष्ण टाहो नित्य फोडी ॥२॥ जाति वित्त गोत कुलशील मात । भजकां त्वरीत भावयुक्त ॥३॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । वैकुंठभुवनी घर केलें ॥४॥

॥ पंचविस ॥ जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं । हरि‌उच्चारणीं पाही मोक्ष सदां ॥१॥ नारायण हरि उच्चार नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥ तेथील प्रमाण नेणवें वेदांसी । तें जीवजंतूंसी केंवी कळे ॥३॥ ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥४॥

॥ सव्वीस ॥ एक तत्व नाम दृढ धरीं मना । हरीसी करुणा ये‌ईल तुझी ॥१॥ तें नाम सोपें रे राम-कृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपा आधीं ॥२॥ नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा । वायां आणिका पंथा जाशील झणीं ॥३॥ ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी । धरोनी श्रीहरि जपे सदां ॥४॥

॥ सत्तावीस ॥ सर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी । रिकामा अर्धघडी राहूं नको ॥१॥ लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरिवीण ॥२॥ नाम मंत्र जप कोटी जा‌ईल पाप । रामकृष्णीं संकल्प धरुनि राहें ॥३॥ निजवृत्ति हे काढी सर्व माया तोडी । इंद्रियां सवडी लपू नको ॥४॥ तीर्थी व्रतीं भाव धरी रे करुणा । शांति दया पाहुणा हरि करी ॥५॥ ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवीं ज्ञान । समाधि संजीवन हरिपाठ ॥६॥

॥ अठठावीस ॥ अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस । रचिले विश्वासें ज्ञानदेवें ॥१॥ नित्य पाठ करी इंद्रायणीतीरीं । होय अधिकारी सर्वथा तो ॥२॥ असावें एकाग्रीं स्वस्थ चित्त मनीं । उल्हासेंकरूनी स्मरण जीवी ॥३॥ अंतकाळी तैसा संकटाचे वेळीं । हरि त्या सांभाळी अंतर्बाह्य ॥४॥ संतसज्जनांनी घेतली प्रचीति । आळसी मंदमति केवीं तरे ॥५॥ श्रीगुरु-निवृत्तिवचन तें प्रेमळ । तोषला तात्काळ ज्ञानदेव ॥६॥

।।एकोणतीस।। कोणाचे हे घर हा देह कोणाचा । आत्माराम त्याचा तोचि जाणे।। मी तू हा विचार विवेके शोधावा । गोविंदा माधवा याची देही।। देही ध्याता ध्यान त्रिकुटीवेगळा । सहस्त्रदळी उगवला सुर्य जैसा।। ज्ञानदेव म्हणे नायनाची ज्योती । या नावेरूपे ती तुम्हीं जाणा।।

।।तीस।। नामसंकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मांतरीची।। न लगती सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण।। ठायीचं बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा।। रामकृष्णहरि विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ।। याविण आणिक असता साधन । वाहतसे आन विठोबाची।। तुका म्हणे सोपे आहे सर्वांहूनी । शहाणा तो धनी घेतो येथे।।

भजन : ज्ञानेश्वर माऊली | ज्ञानराज माऊली तुकाराम

Comments

Popular posts from this blog

श्री संजीवनी समाध्या विषयी माहिती

हरिपाठ